Monday, 21 May 2018

Devak Kalji Re Song | Lyrics | Redu Marathi Movie



देवाक काळजी रे   (Lyrics)








 होणार होताल जाणार जाताल


मागे तु फिरू नको 

उगाच सांडुन खऱ्याची संगत 

खोट्याची धरु नको 

येईल दिवस तुझा ही मानसा 

जीगर सोडु नको 

तुझ्या हाती आहे डाव सारा 

ईसर गजल कालची रे.. 




देवाक काळजी रे 

माझ्या देवाक काळजी रे




सोबती रे तु तुझाच 

अन तुला तुझीच साथ 

शोधूनी तुझी तु वाट 

चाल एकला 

होऊ दे जरा उशीर 

सोडतोस का रे धीर 

रात संपता पहाट 

होई रे पुन्हा 




देवाक काळजी रे 

माझ्या देवाक काळजी रे




फाटक्या झोळीत येऊन पडते 

रोजची नवी निराशा 

सपान गाठीला धरत वेठिला 

कशी र सुटावी आशा 

अवसेची रात नशीबाला 

पुनवेची रात पदराला 

होइन पुनव मनाशी जागव 

खचून जावु नको 

उगाच भयान वादळ वाऱ्याच्या 

पाऊल रोखू नको 

साद घालिस दिस उद्याचा नव्याने 

ईसर गजल कालची रे 




देवाक काळजी रे 

माझ्या देवाक काळजी रे


https://www.youtube.com/watch?v=NMIdNScuTOA


Singer

Ajay Gogawale



Music

Vijay Narayan Gavande




Lyrics

Guru Thakur















2 comments:

  1. Wizard of oz Craps Cheats - Ultimate Guide - Hakkasino 온라인카지노 온라인카지노 dafabet dafabet 바카라사이트 바카라사이트 1181Nfl spreads week 7, week 8 - Choego Casino

    ReplyDelete